हुआन कार्लोस पहिला (स्पॅनिश: Juan Carlos Alfonso Víctor María de Borbón y Borbón-Dos Sicilias, ५ जानेवारी १९३८) हा स्पेन देशाचा माजी राजा आहे. नोव्हेंबर १९७५ ते जून २०१४ दरम्यान राज्यपदावर राहिलेल्या हुआन कार्लोसने १९ जून २०१४ रोजी पदत्याग केला व त्याचा मुलगा फेलिपे सहावा स्पेनचा नवा राजा बनला.
१९३९ मधील स्पॅनिश गृहयुद्धानंतर सत्तेवर आलेल्या हुकुमशहा फ्रांसिस्को फ्रांकोच्या १९७५ मधील मृत्यूनंतर केवळ दोन दिवसांनी हुआन कार्लोस राज्यपदावर आला. त्याने फ्रांकोच्या जुलुमी राजवटीनंतर स्पेनमध्ये लोकशाहीवादी सरकार आणण्यामध्ये मोठा वाटा उचलला.
स्पेनचा पहिला हुआन कार्लोस
या विषयातील रहस्ये उलगडा.