स्पॅनिश यादवी

या विषयावर तज्ञ बना.

स्पॅनिश यादवी (स्पॅनिश: Guerra Civil Española) हे १९३६ ते १९३९ सालांदरम्यान प्रामुख्याने स्पेन देशात लढले गेलेले एक मोठे युद्ध होते. इ.स. १९३६ साली दुसऱ्या स्पॅनिश प्रजासत्ताकाच्या राजवटीविरुद्ध विरोधी गटाने बंड पुकारले. ह्या विरोधी गटाला स्पेनमधील अनेक पारंपारिक मताच्या राजकीय पक्षांचा पाठिंबा होता. ह्या अर्धयशस्वी बंडानंतर स्पेन देश राजकीय व भौगोलिक दृष्ट्या विभागला गेला. त्यानंतर फ्रांसिस्को फ्रँकोच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी गटाने प्रस्थापित स्पॅनिश रिपब्लिकन सरकारविरुद्ध युद्ध सुरू केले. ह्या बंडखोरांना नाझी जर्मनीच्या ॲडॉल्फ हिटलरने व इटलीच्या बेनितो मुसोलिनीने पाठिंब दिला तर मेक्सिको व सोव्हिएत संघाने प्रस्थापित सरकारच्या बाजूने लढण्यासाठी सैन्य पाठवले.

जगातील सर्वात रक्तरंजित युद्धांपैकी एक मानल्या गेलेल्या स्पॅनिश गृहयुद्धामध्ये दोन्ही बाजूंची प्रचंड जिवितहानी झाली. ह्या युद्धात विजय मिळवून लोकशाहीच्या मार्गाने स्थापन झालेले सरकार उलथवून राष्ट्रवादी गटाच्या फ्रँकोने स्पेनमध्ये एकाधिकारशाही स्थापित केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →