स्पर्श (चित्रपट)

या विषयातील रहस्ये उलगडा.

स्पर्श हा १९८० सालचा सई परांजपे दिग्दर्शित भारतीय हिंदी चित्रपट आहे. यामध्ये नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी यांनी अंधांसाठी असलेल्या शाळेतील एक दृष्टिहीन मुख्याध्यापक आणि डोळस शिक्षीकेची प्रेमकहाणी साकारली आहे.

मुख्य कलाकारांच्या सूक्ष्म अभिनयाबरोबरच दृष्टिहीन असणाऱ्यांच्या नातेसंबंधांच्या मुद्यावर हा चित्रपट सर्वाधिक संस्मरणीय ठरला आहे. हा अंध आणि डोळस अश्या दोन जगामधील भावनिक आणि समजातील विभाजन प्रकट करतो. या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तथापि, चित्रपटाच्या प्रदर्शनास जवळपास अजून ४ वर्षे उशीर झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →