स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांची चर्चासत्रे, परिसंवाद, मुलाखती, अनुभव कथन या माध्यमातून मार्गदर्शन मिळावे, यासाठी ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्टच्या वतीने १७ आणि १८ एप्रिल २०१० रोजी



पहिले स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन पुण्यातील टिळक रोड न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आले होते.

मराठी साहित्यिक आणि आयएएस अधिकारी विश्वास पाटील संमेलनाध्यक्ष होते.



२रे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन औरंगाबादला ८-९ जानेवारी २०११ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे होते.

३रे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन २८-२९ जानेवारी, २०१२ या काळात नागपूर येथे झाले. संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख होते.

४थे संमेलन नाशिकला ११-१२ जानेवारी २०१३ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष शेखर गायकवाड होते.

५वे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन कोल्हापूरला ८-९ फेब्रुवारी २०१४ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.विजयकुमार फड होते, तर निमंत्रक डॉ.आनंद पाटील होते.

६वे संमेलन : अहमदनगर येथील नंदनवन लॉन्समध्ये 'स्टडी सर्कल'तर्फे दोन दिवसांचे ६वे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन १०/११-१-२०१५ या काळात झाले. संमेलनाचे उद्‍घाटन राहुरीच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांच्या हस्ते झाले. रंगनाथ नाईकडे हे संमेलनाचे अध्यक्ष होते.

७वे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात १३-१४-१५ फेब्रुवारी २०१६ या काळात झाले.; संमेलनाध्यक्ष MPSCचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →