स्ट्रेप्टोकोकल फॅरिन्जायटिस

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

स्ट्रेप्टोकोकल फॅरिन्जायटिस

स्ट्रेप्टोकोकल फॅरिन्जायटिस, स्ट्रेप्टोकोकल टॉन्सिलायटिस किंवा स्ट्रेप्टोकोकल सोअर थ्रोट (या सगळ्याला मिळून ’स्ट्रेप थ्रोट’ असे म्हणतात) हा ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकल संसर्ग संसर्गामुळे होणारा एक प्रकारचा घशाचा विकार आहे. त्याचा परिणाम घशाची पोकळी, घशातल्या गाठी आणि शक्यतो स्वरयंत्रावरही होतो. ताप, घसा येणे, आणि स्वरयंत्रावर आलेली सूज ही याची लक्षणे आहेत. या आजारामुळे ३७% मुलांचे आणि ५-१५% मोठ्यांचे घसे बसतात.

'स्ट्रेप थ्रोट' हा एक संसर्गजन्य आजार आहे. रुग्णाच्या निकटच्या सहवासात आल्याने तो पसरतो. घशात वाढत असलेया जंतूंची तपासणी केल्यानंतर या आजारचे ठोस निदान करता येते. पण, प्रत्येक वेळी याची गरज नसते. लक्षणे बघूनही औषधोपचार सुरू करता येतात. ज्या ठिकाणी 'स्ट्रेप थ्रोट' असण्याची दाट शक्यता आहे, किंवा तसे ठोस निदान झाले आहे, तिथे प्रतिजैविके देऊन रोगाची पुढची गुंतागुंत थांबविता येते आणि त्यामुळे लवकर बरेही वाटू लागते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →