स्टॉकहोम सिंड्रोम

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

स्टॉकहोम सिंड्रोम

स्टॉकहोम सिंड्रोम ही एक अशी मानसिक स्थिती आहे ज्यामध्ये बंधकांना त्यांच्या अपहरणकर्त्यांबद्दल एक मानसिक आपुलकीचा संबंध निर्माण होतो. ही मानसिक स्तीथी तयार होते जेव्हा एखाद्याला ओलीस ठेवले जाते किंवा अपहरण केले जाते आणि त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. तरी ज्यांच्यावर हे अत्याचार झाले तरी त्या व्यक्ती मध्ये अत्याचार करणाऱ्या माणसा बद्दल सहानुभूती, आपुलकी निर्माण होते. ज्या लोकांना स्टॉकहोम सिंड्रोम झालेला आहे, अश्या लोकांना शोधणे व अश्या लोकांवर शास्त्रशुद्ध संशोधन करणे कठीण आहे, कारण हा आजार दुर्मिळ आहे आणि त्याच्यावर संशोधन अजून पर्यंत पूर्णपणे झालेले नाही. यामुळे हा आजार कसा तयार होतो, त्याचा परिणाम बाधित होणाऱ्या माणसावर कसा होतो हे निश्चित करणे कठीण आहे, आणि खरतर हा एक आजार‌ आहे की फक्त एक मानसिक स्थिती हे अजून पर्यंत तरी निश्चित झालेले नाही.

यामुळे स्थितीचा विकास आणि परिणाम मधील ट्रेंड निश्चित करणे कठीण होते - आणि खरं तर, स्थितीच्या वैधतेबद्दल शंका असल्यामुळे हा एक "विरोधित आजार" आहे.

हा आजार झालेल्या लोकांना, जरी त्यांचे अपहरण झालेलं असेल त्यांना कोणी जबरदस्तीने पळवलेल, बंधक बनवून ठेवलेलं असले तरी असे करणाऱ्या गुन्हेगरांबद्दल त्यांच्या मनात सहानुभूती, आपुलकी निर्माण होते, एवढेच नाही तर गुन्हेगारांनी केलेले कृत्य त्यांना योग्यच वाटायला लागते. हा सिंड्रोम दुर्मिळ आहे: एफबीआयच्या डेटानुसार, गुन्हेगारांच्या बंधनातून सुटल्याच्या नंतर फक्त ८% लोकांमध्ये स्टॉकहोम सिंड्रोम ची लक्षणे आढळली आहेत

या मानसिकतेला स्टॉकहोम सिंड्रोम नाव १९७३ ला स्टॉकहोम शहरातील बँकेमध्ये पडलेल्या दरोड्याच्या नंतर पडले. त्या घटनेत दरोड्यातून सुटका झाल्यानंतर, जे लोक ओलीस होते त्यांनी दरोडेखोरांच्या विरोधात कोर्टात साक्ष द्यायला मनाई केली. या दरोड्या नंतर असे लक्षात आले की पोलिसांनी जे लोक ओलीस होते त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही, यामुळे सुटका झालेले लोकं पुलिसंकडून साक्ष द्यायला तयार नव्हते. स्टॉकहोम सिंड्रोम विरोधाभासी आहे कारण बंदिवानांना त्यांच्या अपहरणकर्त्यांबद्दल वाटणारी सहानुभूती भावना एखाद्या दर्शकाला अपहरणकर्त्यांबद्दल वाटणारी भीती आणि तिरस्काराच्या विरुद्ध असते.

स्टॉकहोम सिंड्रोमचे वैशिष्ट्य दर्शविणारे चार प्रमुख घटक आहेत:



बंधकांच्या मनात अपहरणकर्त्याबद्दल सकारात्मक भावनांचा विकास.

बंधक आणि कैदी यांच्यात पूर्वीचा संबंध नसने.

पोलीस आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास ओलिसांकडून नकार

बंधकांचा अपहरणकर्त्याच्या माणुसकीवर विश्वास, त्यांना धोका म्हणून समजणे बंद करणे, जेव्हा पीडित व्यक्ती गुन्हेगारांन सारखीच मूल्ये, विचार ठेवतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →