स्कीइंग हा बर्फावरती खेळला जाणारा खेळ आहे ज्यात स्कीज्चा वापर केला जातो. स्कीज् बरोबर बूट वापरले जातात जे त्यांत्याशी बाइंडीज् द्वारे जोडता येतात. स्कीइंग हा खेळ दोन प्रकारात विभागता येतो. नॅार्डिक स्कीइंग हा त्यातला सर्वात जुना प्रकार जो स्कँडिनेविया मधे सुरू झाला. नॅार्डिक स्कीइंग मधे वापरले जाणारे बाइंडीज् स्कीइंग करणाऱ्यच्या बूटांच्या फक्त बोटांकडे जोडलेले असतात. ॲल्पाइन स्कीइंग हा प्रकार ॲल्पस् पर्वतात सुरू झाला. आल्पाइन स्कीइंग मधे वापरले जाणारे बाइंडीज् स्कीइंग करणाऱ्यच्या बूटांच्या बोटांकडे आणि टाचेकडे दोन्ही ठिकाणी जोडलेले असतात. बाइंडीज्च्या जोरावर ठरवले जाते की नक्की कोणता स्कीइंगचा प्रकार खेळला जात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्कीइंग
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.