बास्केटबॉल

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बास्केटबॉल

बास्केटबॉल हा एक सांघिक खेळ आहे. ५ खेळाडूंचे दोन संघ चेंडू बास्केटबॉल जाळीमधे टाकून अधिकाधिक गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. बास्केटबॉल जगातील एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे.

सर्वसाधारण बास्केटबॉल जाळीचा व्यास १८ इंच (४५.७ सेंमी) असतो व जाळी १० फूट (३.०५ मी) उंचीवर बॅकबोर्डला लावलेली असते. संघाला गुण मिळवण्यासाठी चेंडू जाळीत टाकावा लागतो. चेंडू जाळीत टाकणारा खेळाडू जर थ्री टिंब रेषेच्या आत असेल तर २ गुण मिळतात अथवा ३ गुण मिळतात. जास्तीत जास्त गुण मिळवणारा संघ विजेता घोषित केला जातो. गुण संख्या समसमान झाल्यास अतिरिक्त वेळ वापरल्या जातो. चेंडू पुढे नेण्यासाठी चेंडू टप्पे देउन चालतांना नेता येतो अथवा पळून किंवा संघ खेळाडूला सोपवता येतो. चेंडू चालतांना दोन वेळा टप्पा केल्यास किंवा हातात धरून चालल्यास नियमांची पायमल्ली होते.

नियमांची पायमल्लीला फाउल असे म्हणले जाते. धोकादायक शारीरिक संपर्क साठी पेनाल्टी लावल्या जाते.

बास्केटबॉल मध्ये सहसा वापरले जाणारे शब्द शूटींग, पासिंग अणि ड्रिब्लिंग आहेत. सहसा संघातील सर्वात उंच खेळाडू सेंटर, स्मॉल फोरवर्ड किंवा पॉवर फॉरवर्ड मध्ये खेळतो व सर्वात छोटा खेळाडू किंवा चेंडू सक्षमपणे हाताळणारे खेळाडू पॉईंट गार्ड असतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →