सौराष्ट्र एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातच्या पोरबंदर शहराला जोडते. ही गाडी मुंबई सेंट्रल व पोरबंदर स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते पोरबंदर दरम्यानचे ९५५ किमी अंतर २० तास १० मिनिटांत पूर्ण करते. सौराष्ट्र एक्सप्रेस गाडीला सहसा तीन ३-टियर वातानुकुलित शयनयान, ७ शयनयान ४ अनारक्षित आणि दोन सामानाचे डबे असतात.
या गाडीचा संपूर्ण रेल्वेमार्ग विद्युत असल्यामुळे वलसाडचे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन सौराष्ट्र एक्सप्रेसची वाहतूक करते.
सौराष्ट्र एक्सप्रेस
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!