खगोलशास्त्रामध्ये सौर तेजस्विता (इंग्रजी: solar luminosity - सोलर ल्युमिनॉसिटी; चिन्ह: L☉) तारे, दीर्घिका यांसारख्या खगोलीय गोष्टींची तेजस्विता मोजण्याचे एक एकक आहे.
सूर्याची वास्तविक तेजस्विता ±०.१% या पातळीवर बदलत असते. त्यामुळे खगोलशास्त्रज्ञ सूर्याची एकूण उत्सर्जित दीर्घकालीन सरासरी तेजस्विता ही खगोलीय वस्तूंची तेजस्विता मोजण्यासाठी वापरतात. आंतरराष्ट्रीय खगोलशात्र संघाने हिची "नाममात्र सौर तेजस्विता" (
L
⊙
N
{\displaystyle L_{\odot }^{N}}
) अशी व्याख्या केली असून तिची अचूक किंमत ३.८२८×10२६ वॅट किंवा ३.८२८×10३३ अर्ग/सेकंद एवढी आहे.
सौर तेजस्विता
यामागील विज्ञान आणि इतिहास.