सोनाली मनोहर कुलकर्णी (जन्मतारीख : १८ मे, १९८८) ही अभिनेत्री असून ती प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करते. कारकिर्दीच्या प्रारंभी एक मॉडेल म्हणून काम केल्यानंतर, सोनालीने केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला झी गौरव पुरस्कारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. ती मुळची पुण्याची आहे. सोनाली ही प्रामुख्याने तिच्या नटरंग ह्या चित्रपटामधील 'अप्सरा आली' ह्या लावणीनृत्यासाठी साठी ओळखली जाते. ह्या अभिनयासाठी तिला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. यानंतर तिने क्षणभर विश्रांती, अजिंठा आणि झपाटलेला २ अशा चित्रपटांमध्ये काम केले. २०१४ मध्ये सोनालीने स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासमवेत मितवा हा चित्रपट केला होता. या चित्रपटासाठी तिला झी गौरव पुरस्कारच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराकरीता नामांकन प्राप्त झाले. तिने ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला व रितेश देशमुखच्या पत्नी, ममता हिची भूमिका केली. तसेच अजय देवगण याच्या सिंघम २ ह्या चित्रपटात देखील सोनाली ने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सोनाली मनोहर कुलकर्णी
थोडक्यात पण महत्त्वाचे.