सॉल्ट लेक सिटी ही अमेरिका देशाच्या युटा राज्याची राजधानी व राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. सॉल्ट लेक शहराची स्थापना १८४७ मध्ये ग्रेट सॉल्ट लेक सिटी या नावाने झाली. ब्रिघॅम यंगच्या नेतृत्वाखाली मॉर्मन धर्मीय व्यक्तींनी येथे प्रथम वसाहत केली. मॉर्मन चर्चचे मुख्यालय येथेच स्थित आहे.
सॉल्ट लेक सिटी २००२ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते. युटा जॅझ हा नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये खेळणारा बास्केटबॉल संघ येथेच स्थित आहे.
सॉल्ट लेक सिटी
या विषयातील रहस्ये उलगडा.