युटा (इंग्लिश: Utah, उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पश्चिम भागात वसलेले युटा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १३वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३४व्या क्रमांकाचे राज्य आहे.
युटाच्या पश्चिमेला नेव्हाडा, पूर्वेला कॉलोराडो, दक्षिणेला अॅरिझोना, उत्तरेला आयडाहो, ईशान्येला वायोमिंग तर आग्नेयेला न्यू मेक्सिको ही राज्ये आहेत. सॉल्ट लेक सिटी ही युटाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. युटामधील ८० टक्के रहिवासी ऑग्डेन-सॉल्ट लेक सिटी-प्रोव्हो ह्या शहरी पट्ट्यामध्ये राहतात. त्यामुळे ही महानगरे वगळता युटामधील इतर भागांमध्ये अत्यंत तुरळक वस्ती आहे.
युटामधील ६० टक्के नागरिक येशू ख्रिस्ताच्या आधुनिक भक्तांच्या चर्चचे अनुयायी आहेत. ह्या समुदायाला मॉर्मन (Mormon) ह्या नावाने देखील ओळखले जाते.
खुल्या हवेतील मनोरंजन क्रीडांसाठी युटा राज्य प्रसिद्ध आहे. स्कीइंग हा येथील एक लोकप्रिय खेळ आहे. खाणकाम, मीठ उत्पादन, शेती हे येथील प्रमुख उद्योग आहेत.
युटा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.