सेरेनगेटी राष्ट्रीय उद्यान हे उत्तर टांझानियामधील एक मोठे राष्ट्रीय उद्यान आहे जे १४,७६३ चौरस किमी (५,७०० चौ. मैल)वर पसरलेले आहे. हे पूर्वेकडील मारा प्रदेश आणि ईशान्य कडे सिमीयू प्रदेशात स्थित आहे आणि त्यात १५,००,००० हेक्टर (३७,००,००० एकर) सवानाचा समावेश आहे. या उद्यानाची स्थापना १९४० मध्ये झाली.
सेरेनगेटी हे जगातील १.५ दशलक्ष पेक्षा जास्त ब्लू वाइल्डबीस्ट आणि २५०,००० झेब्रा प्राण्यांच्या स्थलांतरासाठी प्रसिद्ध आहे. हे राष्ट्रीय उद्यान हे आफ्रिकेतील सर्वात जास्त सिंहांचे निवासस्थान आहे. जंगलतोड, लोकसंख्या वाढ यांचा इथे धोका आहे.
"सेरेनगेटी" हे नाव मसाई लोकांनी क्षेत्रासाठी वापरलेल्या सिरिंगेट शब्दापासून येते, ज्याचा अर्थ "कायमस्वरूपी चालणारी जमीन" असा होतो.
सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यान
थोडक्यात पण महत्त्वाचे.