ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान

ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान हे भारतातील एक राष्ट्रीय उद्यान आहे, जे हिमाचल प्रदेश राज्यातील कुलु प्रदेशात आहे. या उद्यानाची स्थापना १९८४ मध्ये झाली आणि १,१७१ चौरस किमी (४५२ चौ. मैल) क्षेत्रफळावर पसरले आहे. ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान हे असंख्य वनस्पती आणि ३७५हून अधिक प्रकारच्या जीवजंतूंचे निवासस्थान आहे. यांत अंदाजे ३१ सस्तन प्राणी, १८१ पक्षी, ३ सरपटणारे प्राणी, ९ उभयचर प्राणी, ११ जंत, १७ मोलस्क आणि १२७ कीटकांचे प्रकार आहेत. ते १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे संरक्षित आहेत; ज्यामुळे कोणत्याही प्रकारची शिकार करण्यास येथे परवानगी नाही.

जैवविविधता संवर्धनाच्या निकषाखाली, जून २०१४ मध्ये, ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यानाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →