सेबास्टियान फेटेल (जर्मन: Sebastian Vettel ; जर्मन उच्चारण: zeˈbasti̯an ˈfɛtəl) (३ जुलै, इ.स. १९८७ ; हेपेनहाइम, हेसेन, पश्चिम जर्मनी - हयात) हा फॉर्म्युला वन शर्यतींमधील चालक आहे. सध्या (इ.स. २०११) रेड बुल रेसिंग संघाचा चालक व २०१०, २०११, २०१२ व २०१३ ह्या सलग चार हंगामांचा विजेता आहे. २००९ च्या मोसमात सेबास्टियान फेटेल ने आपल्या फॉर्म्युला वन कारकिर्दीची सुरुवात केली. रेड बुल रेसिंग संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाच्या दौडीत दुसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली. असे करणारा तो सर्वात कमी वयाचा चालक ठरला. तसेच रेड बुल संघासाठी त्यांचे पहिले पोल स्थान आणि पहिला शर्यत विजय ही मिळवला. त्यानंतरच्या मोसमातच सर्वात कमी वयाचा फॉर्म्युला वन विश्व विजेता चालक बनण्याचा मान त्याने पटकावला. पहिल्या अजिंक्यपदानंतर २०११, २०१२ व २०१३ च्या मोसमात त्याने पुन्हा फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाला गवसणी घातली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सेबास्टियान फेटेल
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.