सेना दिवस (भारत)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

भारताचा सेना दिवस (किंवा लष्कर दिवस) हा दरवर्षी १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. लेफ्टनंट जनरल कोडंदेरा एम. करिअप्पा (नंतर ते फील्ड मार्शल बनले) यांनी जनरल फ्रान्सिस रॉय बुचर यांच्याकडून १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल हा साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत तसेच सर्व मुख्यालयांमध्ये परेड आणि इतर लष्करी कार्यक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो.

१५ जानेवारी २०२३ रोजी, बेंगळुरूमध्ये ७५ वा भारतीय लष्कर दिन साजरा केला. देश आणि नागरिकांच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे.

देशभरात उत्सव साजरा होत असताना, मुख्य सेना दिवस परेड ही दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील करिअप्पा परेड मैदानावर आयोजित केली जाते. या दिवशी शौर्य पुरस्कार आणि सेना पदकेही दिली जातात. परमवीर चक्र आणि अशोक चक्र पुरस्कार विजेते दरवर्षी ह्या परेडमध्ये सहभागी होतात. लष्करी हार्डवेअर, असंख्य तुकडी आणि लढाऊ प्रदर्शन परेडचा भाग आहे. २०२० मध्ये, कॅप्टन तानिया शेरगिल या सेना दिवस परेडचे नेतृत्व करणाऱ्या पहिली महिला अधिकारी बनल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →