सेंदाई

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सेंदाई

सेंदाई (जपानी: 青森市) ही जपान देशाच्या उत्तर भागातील मियागी प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सेंदाई तोक्योच्या ३७० किमी उत्तरेस प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०२० साली सुमारे ११ लाख लोकसंख्या असलेले सेंदाई हे जपानच्या तोहोकू प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे. ११ मार्च २०११ रोजी आलेल्या प्रलयंकारी भूकंपामध्ये सेंदाई व परिसराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

जपानच्या शिनकान्सेन रेल्वे जाळ्यावरील सेंदाई हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. तोहोकू शिनकान्सेन सेंदाईला तोक्यो व ओमोरीसोबत जोडते..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →