सेंट्रल बक्स हायस्कूल - वेस्ट तथा सी बी वेस्ट ही अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील डॉइल्सटाउन शहरात असलेली एक सार्वजनिक शाळा आहे. येथे इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात.). ही शाळा सेंट्रल बक्स शालेय क्षेत्राचा एक भाग आहे.
२०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात सी बी वेस्टमध्ये एकूण १,३९१ विद्यार्थी होते आणि विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर १४.०० इतके होते. एकूण विद्यार्थ्यांपैकी ५१.५% मुले आणि ४८.५% मुली होत्या. शाळेतील १७.७% विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील होते, १७.३% विद्यार्थी विशेष शिक्षण कार्यक्रमात सहभागी होते आणि २.५% विद्यार्थी बिगर-इंग्लिश मातृभाषा असणारे होते.
यु.एस. न्यूझ अँड वर्ल्ड रिपोर्ट या नियतकालिकानुसार सध्या सी बी वेस्ट हे पेनसिल्व्हेनियामधील ४३ व्या क्रमांकाचे सर्वोत्तम उच्च माध्यमिक विद्यालय आहे. लिंडेल डेव्हिस हे शाळेचे सध्याचे प्राचार्य आहेत.
सेंट्रल बक्स हाय स्कूल वेस्ट
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.