जेम्स आल्बर्ट मिशनर (फेब्रुवारी ३, इ.स. १९०७:डॉइल्सटाउन, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ऑक्टोबर १६, इ.स. १९९७:ऑस्टिन, टेक्सास, अमेरिका) हे पुलित्झर पुरस्कार विजेते अमेरिकन लेखक होते.
मिशनरने ४०पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. यांतील बहुतेक पुस्तकांची कथानके दीर्घ काळात पसरलेली आणि अनेक कुटुंबांतील अनेक पिढ्यांचा माग घेणारी आहेत. ही कथानके विशिष्ट प्रदेशांत असून त्यांत तेथील इतिहासाचा बारीक तपशील विणलेला आहे. ही पुस्तके लिहिण्यासाठी मिशनरने प्रत्येक प्रदेशांत अनेक वर्षे घालवून संशोधन केले होते.
जेम्स मिशनर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.