जेरार्ड जेम्स बटलर (जन्म १३ नोव्हेंबर १९६९) एक स्कॉटिश अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. कायद्याचा अभ्यास केल्यानंतर, १९९० च्या दशकाच्या मध्यात मिसेस ब्राउन (१९९७), जेम्स बाँड चित्रपट टुमॉरो नेव्हर डायज (१९९७), आणि टेल ऑफ द ममी (१९९८) यासारख्या निर्मितीमध्ये छोट्या भूमिकांसह ते अभिनयाकडे वळले. २००० मध्ये, त्याने क्रिस्टोफर प्लमर आणि जॉनी ली मिलर यांच्यासोबत गॉथिक हॉरर फिल्म ड्रॅकुला २००० मध्ये काउंट ड्रॅकुला म्हणून काम केले.
अटिला (२००१) या लघु मालिकेत त्याने अटिला द हनची भूमिका केली, त्यानंतर क्रिश्चियन बेलसोबत (2002) आणि अँजेलिना जोली सोबत लारा क्रॉफ्ट:टूम्ब रेडर - द क्रॅडल ऑफ लाइफ (२००३) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मायकेल क्रिचटनच्या सायन्स फिक्शन ॲडव्हेंचर टाइमलाइन (२००३) मध्य काम केले.
बटलरने झॅक स्नायडरच्या फँटसी वॉर फिल्म ३०० मधील किंग लिओनिदासच्या भूमिकेसाठी जगभरात ओळख मिळवली. त्या भूमिकेमुळे त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी एम्पायर अवॉर्ड आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी सॅटर्न अवॉर्डसाठी नामांकन मिळाले आणि सर्वोत्कृष्ट फाईटसाठी एमटीव्ही मूव्ही अवॉर्ड जिंकला.
जेरार्ड बटलर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.