सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट मैदान

या विषयातील रहस्ये उलगडा.

सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट मैदान

सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट मैदान (सामान्यत: सेंट जॉर्ज पार्क, क्रुसेडर्स मैदान किंवा फक्त क्रुसेडर्स म्हणून ओळखले जाणारे) हे दक्षिण आफ्रिकेतील गेबेर्हा (पूर्वी पोर्ट एलिझाबेथ म्हणून ओळखले जाणारे) क्रिकेटचे मैदान आहे. हे पोर्ट दक्षिण आफ्रिकेतील सर्वात जुने क्रिकेट क्लब-एलिझाबेथ क्रिकेट क्लब, इस्टर्न प्रोव्हिन्स क्लब आणि सनरायझर्स इस्टर्न केप यांचे घरचे मैदान आहे. दक्षिण आफ्रिकेत ज्या ठिकाणी कसोटी सामने आणि एकदिवसीय सामने खेळले जातात त्यापैकी हे एक ठिकाण आहे. हे ग्रॅहमटाउनमधील किंग्सवुड कॉलेजपेक्षा जुने आहे. हे मैदान त्याच्या ब्रास बँडसाठी प्रसिद्ध आहे जे मोठ्या सामन्यांदरम्यान वातावरण निर्मितीसाठी वाजवले जाते.

मार्च १८८९ मध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून पराभव केला तो ह्या मैदानावरील पहिला कसोटी सामना होता. हा दक्षिण आफ्रिकेचा पहिला कसोटी सामना होता. २०२३ पर्यंत, या मैदानावर ३२ कसोटी सामने खेळले गेले आहेत ज्यात दक्षिण आफ्रिकेने १४ जिंकले आहेत आणि १३ त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी जिंकले तर ५ सामने अनिर्णित राहिले आहेत.

या मैदानावर पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय डिसेंबर १९९२ मध्ये खेळवला गेला ज्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ६ गडी राखून पराभव केला होता. २०२३ पर्यंत, या मैदानावर ४३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत ज्यात २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पाच सामन्यांचा समावेश आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →