सॅन्यो शिनकान्सेन (जपानी: 山陽新幹線) हा जपान देशामधील शिनकान्सेन ह्या द्रुतगती रेल्वे प्रणालीमधील एक मार्ग आहे. १९७२ सालापासून कार्यरत असलेला व ५५४ किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग पश्चिम जपानमधील ओसाका व फुकुओका ह्या प्रमुख शहरांना जोडतो. तसेच तोकाइदो शिनकान्सेन मार्गाद्वारे फुकुओकापासून थेट राजधानी तोक्यो शहरापर्यंत प्रवास करता येतो. तसेच फुकुओका रेल्वे स्थानकावरून क्युशू शिनकान्सेनमार्गाद्वारे कागोशिमा ह्या जपानच्या नैऋत्य टोकावरील शहरापर्यंत जलद रेल्वेप्रवास शक्य आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सॅन्यो शिनकान्सेन
या विषयावर तज्ञ बना.