सूर्यग्रहण

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सूर्यग्रहण

जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल फार पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आढळतात.

सूर्यग्रहण हे अमावस्या दिवशी दिसते. परंतु सर्वच अमावस्या दिवशी सूर्यग्रहण दिसत नाही. कारण सर्वच अमावस्या दिवशी पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा एका रेषेत येत नाहीत. पृथ्वीच्या कक्षेत आणि चंद्राच्या कक्षेत पाच अंशाचे किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असते परंतु अमावस्याला चंद्राची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा एका रेषेत येतात त्या अमावस्येला सूर्यग्रहण होते.

पाहताना घ्यावयाची काळजी:

दुर्बिण किंवा द्विनेत्रीद्वारे तज्ज्ञ वगळता कुणीही ग्रहण पाहू नये. साध्या डोळ्यांनी कधीही ग्रहण पाहू नये. त्यामुळे आंधळेपणा येऊ शकतो. सूर्य ग्रहण solar eclipse time in india पाहण्यासाठी सुरक्षित काळी वेल्डिंग काच,फिल्टर किंवा सुरक्षित चष्मा वापरावा. विशेष काळजी घ्यावी.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →