चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस पौर्णिमा असे म्हणतात. अधिक नेमक्या शब्दात सांगायचे तर, पौर्णिमा ही अशी वेळ आहे, जेव्हा भूमध्यापासून दृग्गोचर सूर्याच्या आणि चंद्राच्या रेखावृत्तांमध्ये १८० अंशाचा फरक असतो. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे पूर्णबिंब सूर्यास्ताच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला मावळते. पौणिमा ही हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यात एकदा येते. प्रतिपदेपासून आरंभ झालेल्या शुक्ल (शुद्ध) पक्षाचा तो शेवटचा दिवस असतो.
इंग्रजीत पौर्णिमेला Full Moon म्हणतात.
पौर्णिमेलाच मराठीत पुनव हा शब्द आहे, हिंदीत पूर्णिमा किंवा पूनम.
पौर्णिमा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?