सुहास शिरवळकर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सुहास शिरवळकर ऊर्फ सु.शि. ( १५ नोव्हेंबर १९४८; - ११ जुलै २००३) हे एक प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक होते.

शिरवळकरांनी १९७४ साली रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यकथा लिहिल्या. १९८० सालापासून ते 'सामजिक कादंबरी' या साहित्यप्रकाराकडे वळले. 'लोकांना आवडेल ते' अशा मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, शिरवळकरांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले. रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी लघुकथाही लिहिल्या. या कथांचे पुढे कथासंग्रह झाले. त्यांनीकाही बालकथादेखील लिहिल्या. सुहास शिरवळकरांच्या निधनानंतर त्यांनी लिहिलेल्या कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या 'देवकी' या कथेवर मराठी चित्रपट बनला, तर 'दुनियादारी', 'कोवळीक' या त्यांच्या कादंबऱ्यांवर दूरचित्रवाणी मालिका झाल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →