सुहानी भटनागर ही हिंदी चित्रपट सृष्टीतील एक बाल कलाकार होती. हिंदी चित्रपट अभिनेते आमिर खान निर्मित चित्रपट दंगल मध्ये ती प्रथम झळकली होती.
तिने बाल वयातच मॉडेल म्हणून विविध दूरदर्शन जाहिरातींमध्ये तसेच साहित्य विक्रीच्या संचिका आणि चित्रफितींमध्ये काम केले आहे. इ.स. २०१६ मध्ये आलेल्या दंगल या चित्रपटामुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. वयाच्या दहाव्या वर्षीच या चित्रपटात तिने आमिर खानची धाकटी मुलगी म्हणून बबिता फोगाट ची भूमिका निभावली होती. तिने आपले प्राथमिक शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल, फरिदाबादमध्ये पूर्ण केले होते. त्यानंतर सुहानी मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेत होती. ती फरिदाबाद येथील मानव रचना शिक्षण संस्थेत द्वितीय वर्षात शिकत होती. शिक्षणानंतर अभिनय क्षेत्रात कारकीर्द करण्याचे तिचे स्वप्न होते, पण ते पूर्ण होऊ शकले नाही.
सुहानी भटनागर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.