सुश्मिता बॅनर्जी

या विषयातील रहस्ये उलगडा.

सुष्मिता बॅनर्जी किंवा सयीदा कमला उपाख्य सुष्मिता बंदोपाध्याय (?? - सप्टेंबर ४, इ.स. २०१३) ही भारतात जन्मलेली व बंगाली आणि इंग्लिश भाषेत लिखाण करणारी लेखिका होती. तिने काबुलीवालार बंगाली बोऊ हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहिले. यात तिने आपल्या अफगाण युवकाशी झालेल्या लग्नाचे व अफगाणिस्तानमधील जीवनाचे वर्णन केले आहे. या पुस्तकावरून एस्केप फ्रॉम तालिबान हा चित्रपट निर्माण केला गेला.

सप्टेंबर ४, २०१३ रोजी अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतातील तिच्या राहत्या घरातून ओढून नेऊन तालिबानने तिची हत्या केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →