सुरेश रैना (२७ नोव्हेंबर, इ.स. १९८६ - ) हा भारत क्रिकेट संघातील एक डावखुरा आक्रमक फलंदाज होता. तो अधूनमधून फिरकी गोलंदाजी सुद्धा करत असे. तो उत्तर प्रदेश क्रिकेट संघाकडून राष्ट्रीय सामने खेळत असे. आय.पी.एल स्पर्धेत रैना चेन्नई सुपर किंग्स या संघाचा उपकर्णधार होता. आय.पी.एल. मधील सर्वात जास्त धावा व झेल त्याच्याच नावावर आहे. आय.पी.एल मधील सर्वात जास्त सामने त्याने खेळले आहेत. सुरेश रैना याने २००५ मध्ये १८ वर्षाचा असताना श्रीलंका विरुद्ध् आपल्या एकदिवसीय कारा=किर्दीस सुरुवात केली. कसोटी सामने खेळण्यास त्याने २०१० मध्ये सुरुवात केली. २०११ क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील तो एक सदस्य होता.याने १ डिसेंबर २००६ रोजी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.हा भारताचा पहिलाच टी ट्वेंटी सामना होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुरेश रैना
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.