रिकी पाँटिंग

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

रिकी पाँटिंग

रिकी थॉमस पॉंटिंग (१९ डिसेंबर, इ.स. १९७४: लॉन्सेस्टन, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आणि माजी कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू स्लिप आणि फलंदाजाजवळच्या जागांमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होता. ऑस्ट्रेलियाच्या घरगुती स्पर्धांमध्ये तो टास्मानियन टायगर्सकडून, बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्सकडून खेळतो तर आय.पी.एल.मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळलेला आहे. भारताचा सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा यांच्या बरोबरीने अनेक जण त्याला आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानतात.

२९ नोव्हेंबर २०१२ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३० नोव्हेंबर २०१२ पासून पर्थ इथे सुरू झालेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना हा पंटर या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या रिकी पॉंटिंगचा कारकिर्दीतील १६८ वा आणि अखेरचा सामना ठरला. या सामन्यासोबत त्याने सर्वाधिक कसोट्या खेळणारा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू म्हणून स्टीव वॉच्या विक्रमाशी बरोबरी केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →