सुरेश ओबेरॉय (१७ डिसेंबर, १९४६:क्वेटा, पाकिस्तान - ) हा एक भारतीय अभिनेता आणि राजकारणी आहे. याने मुख्यत्वे हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. याला १९८७मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. ओबेरॉयने आपल्या कारकिर्दीची सुरुवात रेडिओ, मॉडेलिंगने केली. नंतर त्याने बॉलीवूडमध्ये काम मिळवले.सुरेश ओबेरॉयचा मुलगा विवेक ओबेरॉयसुद्धा अभिनेता आहे.
ओबेरॉय यांचा जन्म आनंद सरूप ओबेरॉय आणि कर्तार देवी यांच्या पोटी तत्कालीन ब्रिटिश भारतातील बलुचिस्तान प्रांताच्या क्वेटा शहरात, झाला. फाळणीमुळे सुरेश ओबेरॉय एका वर्षापेक्षा लहान असतानाच चार भाऊ आणि बहिणींसह हे कुटुंब भारतात आले आणि नंतर हैदराबाद राज्यात स्थलांतरित झाले जेथे त्यांच्या कुटुंबाने वैद्यकीय सामानाच्या दुकानांची स्थापन केली. ओबेरॉय यांनी हैदराबादमधील सेंट जॉर्ज ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण घेतले. शाळेत असताना हा टेनिस आणि जलतरण चॅम्पियन होता. त्याला बॉय स्काउट मध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. वडिलांच्या मृत्यूनंतर हायस्कूलमधून बाहेर पडून त्यांच्या भावासह त्यांची फार्मसी साखळी चालू ठेवली. त्याला पश्तो, पंजाबी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, तेलगू आणि तमिळ या भाषा येतात.
सुरेश ओबेरॉय
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?