सूरज शर्मा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सूरज शर्मा

सूरज शर्मा (जन्म २१ मार्च १९९३) हा एक भारतीय अभिनेता आहे ज्याने २०१२ साली लाइफ ऑफ पाय या चित्रपटातून पदार्पण केले.आं ली यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट त्याच नावाच्या कादंबरीवरून बनवला गेला आणि शर्मा यांनी समीक्षकांची प्रशंसा तसेच बाफ्टा रायझिंग स्टार पुरस्कार नामांकन मिळवले. २०१४ मध्ये, त्याने होमलँड या शोटाइम मालिकेच्या सीझन ४ मध्ये अयान इब्राहिमची भूमिका केली होती. २०१८ ते २०२० पर्यंत, त्याने सीबीएस कॉमेडी-नाटक मालिका गॉड फ्रेंडेड मी मध्ये राकेश सिंगची भूमिका केली.

शर्मा यांचा जन्म भारतातील नवी दिल्ली येथील एका मल्याळी कुटुंबात झाला. त्यांचे वडील, गोकुल चुराई, सॉफ्टवेर अभियंता आहेत तर त्यांची आई, शैलजा शर्मा अर्थशास्त्रज्ञ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →