सुमो (जपानी: 相撲) हा जपान देशामध्ये खेळला जाणारा एक पारंपरिक खेळ आहे. कुस्तीचा एक प्रकार असणाऱ्या सुमो खेळामध्ये दोन खेळाडू एकमेकांना रिंगणाच्या बाहेर ढकलण्याचा किंवा खाली पाडण्याचा प्रयत्न करतात.
ऐतिहासिक काळापासून खेळल्या जात असलेल्या सुमो खेळाला शिंतो धर्मामध्ये महत्त्व आहे. जपानचा राष्ट्रीय खेळ मानला जाणाऱ्या सुमोमध्ये आजही शिंतो धर्मामधील अनेक जुन्या व पारंपारिक पद्धती वापरात आहेत व व्यावसायिक सुमो पैलवानांना त्या पाळणे बंधनकारक आहे.
सुमो
थोडक्यात पण महत्त्वाचे.