सुधीर तेलंग

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सुधीर तेलंग (इ.स. १९६०:बिकानेर; इ.स. २०१६) हे एक मराठी व्यंगचित्रकार होते. त्यांची व्यंगचित्रे विविध वर्तमानपत्रांतून ३५ वर्षे प्रसिद्ध झाली.

लहानपणापासून तेलंग यांना टिनटिन, फँटम, ब्लाँडी या व्यक्तिरेखांचे आकर्षण होते. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिले व्यंगचित्र इंदिरा गांधींचे काढले. लालकृष्ण अडवाणींची किमान एक हजार चित्रे त्यांनी काढली आहेत.

सुधीर तेलंग यांची व्यंगचित्रे प्रथम राजस्थान पत्रिकेत प्रसिद्ध झाली. १९८२ मध्ये द इलस्ट्रेटेड वीकलीत व नंतर दिल्लीच्या एका हिंदी पत्रात येऊ लागली. पुढे हिंदुस्तान टाइम्स, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि एशियन एज या वृत्तपत्रांतूनही त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली.

त्यांच्या व्यंगचित्रांच्या प्रेमात असलेल्या मुलीशीस त्यांचा विवाह झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →