सुचित्रा सेन

यामागील विज्ञान आणि इतिहास.

सुचित्रा सेन (एप्रिल ६, इ.स. १९३१:पबना, बांगला देश - जानेवारी १७, इ.स. २०१४:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत) ही हिंदी आणि बंगाली चित्रपटांत अभिनय करणारी अभिनेत्री होती. सुचित्रा सेन आणि उत्तम कुमार यांनी अभिनय केलेले अनेक बंगाली चित्रपट लोकप्रिय झाले.

सुचित्रा सेन यांचे माहेरचे नाव रमा दासगुप्ता होते. त्यांचे वडील करुणामय दासगुप्ता हे एका शाळेत हेडमास्तर होते. सुचित्रा सेन यांच्या पतीचे नाव दिवानाथ सेन, मुलीचे मुनमुन सेन आहे आणि आईचे नाव इंदिरा होते. मॉडेल रिया सेन या सुचित्रा सेन यांच्या नात आणि मुनमुन सेन यांच्या कन्या आहेत.

सुचित्रा सेन यांनी उत्तमकुमार यांच्या सोबत अनेक चित्रपटांत कामे केली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →