सुंदर बटवा (इंग्लिश: Common Teal) हा एक पक्षी आहे. सोनुली किंवा खैरा बड्डा या नावानेही हा पक्षी ओळखला जातो आणि हिंदीत या पक्ष्याला चैती, पतारी, लोहिया किर्रा, सौचुरूक ही नावे आहेत.
सुंदर बटवा बदकापेक्षा लहान असतो व वनकीपेक्षा मोठा असतो. नराच्या अंगावर करड्या रंगाच्या दाट काड्या असतात. डोके तांबूस व डोळ्यांपासून मानेपर्यंत हिरव्याकंच रंगाचा पट्टा असतो. पत्त्याला पांढरी किनार असते. त्यांचे पंख उडताना काळे, हिरवे व बदामी असे ठळक तिरंगी दिसू लागतात. मादीच्या अंगावर गडद व फिकट रंगाचे ठिपके दिसतात. खालील भाग पिवळसर असतो. उडताना पंख काळे व हिरवे असे दोन रंगी दिसतात. सुंदर बटवा हा भारत, श्रीलंका, मालदीव आणि अंदमान तसेच निकोबार बेटात हिवाळाी पाहुणे असतात. सुंदर बटवा झिलानी व सरोवरे या ठिकाणी आढळतात.
सुंदर बटवा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?