सीरियातील भाषा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

अरबी ही सीरियाची अधिकृत भाषा असुन सिरीयामधे ती सर्वाधिक प्रमाणात बोलली जाते. रोजच्या वापरत अनेक अरबी बोलीभाषा वापरल्या जातात, विशेषतः सिरियातील पश्चिमेकडील भागात लेव्हान्टाईन आणि उत्तरभागात मेसोपोटेमिया भाषा बोलली जाते. अरबी भाषेच्या एन्सायक्लोपिडियानुसार अरबी व्यतिरिक्त कुर्दिश, तुर्किश, नियो-अरामाईक (चार बोलीभाषा), सर्कसियन, चेचन, आर्मेनियन, आणि शेवटी ग्रीक या भाषा बोलल्या जातात.

इतिहासातील नोंदीप्रमाणे अरैमिक अरबी भाषेच्या आधी या भागात अरमेनिक भाषा बोलली जायची, आजदेखील अस्सिरींयन्स लोकांमध्ये अरमेनिक भाषा बोलली जाते आणि तसेच शास्त्रीय सिरियाक भाषा अजूनही अनेक सिरियाक ख्रिश्चन संप्रदायांत धार्मिक भाषा म्हणून वापरली जाते. निओ-अरामाईक भाषा अजूनही माउलोला आणि दमास्कसच्या ५६ किलोमीटर (३५ मील) पूर्व भागातील दोन गावांमध्ये बोलली जाते.

सीरियन साइन ही भाषा बहिरा समाजाची मुख्य भाषा म्हणून ओळखली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →