रशियन भाषा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

रशियन भाषा

रशियन भाषा (रशियन: русский язык, रुस्की यिझिक) ही युरेशिया खंडामधील एक प्रमुख भाषा आहे. स्लाविक भाषांपैकी ही सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. रशियन भाषा इंडो-युरोपीय भाषाकुळातील स्लाविक भाषाकुळात गणली जाते. रशियन प्रथम भाषा असणाऱ्या भाषकांची जगभरातील संख्या सुमारे १६.४ कोटी (इ.स. २००६चा अंदाज) असून द्वितीय भाषा असणाऱ्या भाषकांची संख्या धरता एकूण भाषकसंख्या जगभरात २७.८ कोटी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →