सिलोन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५७-५८

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सिलोन क्रिकेट संघाने मार्च १९५८ मध्ये भारताचा दौरा केला. या दौऱ्यात दोन प्रथम-श्रेणी सामने आणि एक किरकोळ सामना खेळला गेला.

१४ ते १६ मार्चदरम्यान मद्रास येथे मद्रासविरुद्ध एम. जे. गोपालन ट्रॉफीचा प्रथम-श्रेणी सामना खेळला गेला. मद्रासने हा सामना २ गडी राखून जिंकला. त्यानंतर १८ मार्च रोजी मद्रास क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय अकराविरुद्ध किरकोळ सामना खेळला गेला. दौऱ्यातील शेवटचा प्रथम-श्रेणी सामना २१ ते २३ मार्चदरम्यान बंगळूर येथे म्हैसूरविरुद्ध खेळला गेला आणि तो अनिर्णित राहिला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →