सिलोन क्रिकेट संघाने डिसेंबर १९३२ आणि जानेवारी १९३३ मध्ये भारताचा दौरा केला. त्या वेळी सिलोनला कसोटी दर्जा प्राप्त नव्हता, परंतु तीन दिवसांचे दोन अनधिकृत कसोटी सामने खेळले गेले आणि दोन्ही सामने अनिर्णित राहिले. या दौऱ्यात इतर चार प्रथम-श्रेणी सामने आणि चार किरकोळ सामनेही खेळले गेले. सिलोनच्या संघाचा हा पहिलाच परदेश दौरा होता. पतियाळा आणि सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार यांच्याविरुद्ध मिळवलेले विजय हे सिलोनचे प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील पहिले विजय होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिलोन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९३२-३३
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?