सिंधुघोष वर्गाच्या पाणबुड्या भारतीय आरमाराच्या पाणबुड्यांपैकी एक प्रकारच्या पाणबुड्या आहेत. यांची रचना किलो वर्गाच्या पाणबुड्यांवर आधारित आहे. या डीझेल-विद्युच्चलित पाणबुड्या १९८६पासून आरमारी सेवेत आहेत.
या पाणबुड्या रोसोवूरुझेनी या रशियन कंपनीने भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार बनविल्या. झ्वेझदोच्का गोदीमध्ये बांधण्यात आलेल्या या पाणबुड्या प्रॉजेक्ट ८७७ या संकेतनावाखाली बनविण्यात आल्या. यांची साधारण क्षमता ३,००० टन असून या ३०० मीटर खोलपर्यंत बुडी मारू शकतात. पाण्याखाली १८ नॉटच्या वेगाने सरकू शकणाऱ्या या पाणबुड्या ५३ खलाशी व अधिकारी घेउन सतत ४५ दिवस पाण्याखाली एकांड्या मोहिमेवर राहू शकतात.
सिंधुघोष वर्गाच्या पाणबुड्या
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.