1)(Ref.No 325)
2)मराठी-शुभ्र कुलंग
3)International-Grus leucogeranus
4)English-Siberian or Great White Crane
हा मुख्यत्वे सायबेरियातील स्थानिक क्रौंच असून भारतात स्थलांतर करतो. अत्यंत दुर्मिळ अश्या पक्ष्यांमध्ये याची गणना होते व सध्या नामाशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा पक्षी भारतातील भरतपुर येथील राष्ट्रीय उद्यानात काही काळापर्यंत नियमीतपणे स्थलांतर करत असे. परंतु काही वर्षांपासुन या पक्ष्यांची संख्याच न उरल्याने स्थलांतर होत नाहि. सध्या रशियन सरकार तर्फे या पक्ष्याला वाचवायचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालु आहेत. सायबेरीयातील जंगलामध्ये काही कळप शिल्ल्क असून त्यांची संख्या काही शेकड्यांमध्ये आहे. या पक्ष्यांची संख्या कमी व्हायचे मोठे कारण म्हणजे झालेली शिकार. या पक्ष्यांचा स्थलांतराच्या मार्गात खासकरून अफगणीस्थान व पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणात शिकार होत असे.
सायबेरियाई क्रौंच
या विषयातील रहस्ये उलगडा.