साम्सुन (तुर्की: Samsun ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १२ लाख आहे. साम्सुन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
१९ मे, इ.स. १९१९ रोजी मुस्तफा कमाल अतातुर्कने तुर्कस्तानचा स्वातंत्र्यलढा येथे सुरू केला होता.
साम्सुन प्रांत
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.