सांडपाणी शुद्धीकरण

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सांडपाणी शुद्धीकरण

जिथे जिथे नागरी वस्त्या होतात सांडपाणी तयार होणे हे स्वाभाविक असते. पाण्याचा वापर मानवी जीवनास आवश्यक आहे. पाण्याच्या वापरानंतर जे पाणी अशुद्ध होउन पुनर्वापरास लायक नसते असे पाण्याला सांडपाणी असे म्हणतात.

आजच्या युगात सांडपाणी हे मानवी तसेच औद्योगिक वापरातून तयार होते. याचे दोन भागात वर्गीकरण करता येईल नागरी सांडपाणी व औद्योगिक सांडपाणी. नागरी सांडपाणी हे मुख्यत्वे नागरी वापरातून तयार होते. उदा: मलमूत्र विसर्जनाला वापरण्यात येउन तयार होणारे (Sewage). अंघोळ तसेच स्वयंपाकघरातून तयार होणारे, कपडे व भांडी घासून तयार होणारे सांडपाणी(sullage).

अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावणे हे नागरी आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचे असते. जर हे पाणी एखाद्या जागी साठून राहिले तर पाण्यामध्ये जीव जंतूंची प्रक्रिया होउन त्यांची संख्या वाढीस लागते. त्याच्या प्रक्रियांमुळे अनेक दूषित दुर्गंधी वायूंची निर्मिती होते व सार्वजनिक आरोग्य बिघडते. तसेच जर हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या संपर्कात आले तर पिण्याच्या पाण्यात जंतूंचा प्रादुर्भाव होउन अनेक जीवघेणे आजार होवू शकतात.

जसे सांडपाण्यामध्ये जीवजंतूंना मोठ्या प्रमाणावर पोषक द्रव्ये असतात तसेच वनस्पती शेवाळी यांना देखील पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणावर असतात. त्यात मुख्यत्वे फॉस्फरस व नायट्रोजनचा समावेश होतो. या तत्त्वांमुळे पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनस्पतीची वाढ होते व त्याचा परिणाम म्हणून आपण जलपर्णी पहातोच. या वनस्पती पाण्यातील जलचरांना चांगले खाद्य जरी बनत असले तरी रात्रीच्या वेळात पाण्याची ऑक्सिजन पातळी मोठ्या प्रमाणावर कमी करतात. यामुळे जलचरांचे अस्तित्त्व धोक्यात येते.

सांडपाणी शुद्धीकरणाचे मुख्य ध्येय मुख्यत्वे पर्यावरणाचे रक्षण आहे ज्याचा फायदा सर्वच नागरी क्षेत्रासाठी होईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →