सांगत्ये ऐका हा एक मराठी भाषेतील कृष्णधवल चित्रपट असून मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात जास्त काळ, म्हणजे सलग १३१ आठवडे चाललेला चित्रपट आहे.
गो. गं. पारखी यांनी इ.स. १९५५ मध्ये 'सांगते ऐका' नावाची एक कादंबरी लिहिली होती. कादंबरी लिहिण्या पूर्वी याच कथेवर पारखी यांनी सिनेमा काढण्याचा एक असफल प्रयत्न केला होता. नंतर अनंत माने यांनी या कादंबरीवर हा चित्रपट निर्माण केला. कादंबरीची दुसरी आवृत्ती १९६१ मध्ये प्रकाशित झाली. नंतर मात्र ही कादंबरी पुन्हा प्रकाशित आणि उपलब्ध झाली नाही. शेवटी ही कादंबरी ५८ वर्षांनी परत एकदा प्रसिद्ध झाली.
हा चित्रपट पुणे येथील विजयानंद या चित्रपटगृहात सलग १३१ आठवडे चालला होता. मराठी चित्रपट सृष्टीतील हा विक्रम अजूनही कुणीही मोडला नाही. चित्रपटातील ‘बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला’ या लावणीला संगीतकार राम कदम यांनी चाल दिली होती. त्यावेळेस कदम हे संगीतकार वसंत पवारचे सहाय्यक होते. मात्र या लावणीने त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. या चित्रपटापासून मराठी चित्रपट सृष्टीत लावणीपटाची लाट सुरू झाली होती.
सांगत्ये ऐका
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.