सरसगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
पाली या गावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे.
पायथ्याच्या पाली गावातून इथे येऊन किल्ला पाहणे ३-४ तासांत होते.
या किल्ल्याच्या पूर्वेला १०-१२ कि.मी. वर सुधागड हा किल्ला आहे. धनगड, कोरीगड, तेलबैला, खंडाळा घाट, नागफणी, जांभूळपाडा, अंबा नदी, गरम पाण्याची कुंडे असणारे उन्हेरे गाव असा मुलूख या गडावरून दिसतो. किल्ल्याच्या पाथ्याला असलेल्या पाली गावात प्रसिद्ध अष्टविनायकांत गणना होत असलेल्या बल्लाळेश्वराचे भव्य मंदिर आहे. सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावानी ओळखला जाणारा हा गिरिदुर्ग, रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुक्यामधे आहे.
इथे स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविणाऱ्या दुर्गवेध युवा मराठा फाऊंडेशनच्या सदस्यांनी किल्ले परिसरातील 3 शूचकूपे(शौचालय), 2 सातवाहन कालीन श्री गणेशाची शिल्पे, चोर दरवाजा, तटबंदीत खोदलेली पाण्याची टाके, वीरगळ, पाण्याचा निचरा करणारे नाले, महादरवाजावरील कोरीव शिल्पे असा ऐतिहासिक वारसा भेटला आहे.
सरसगड
या विषयावर तज्ञ बना.