{{किल्ला
|नाव=अवचितगड
|उंची= ३०० मीटर
|प्रकार=
|श्रेणी= सोपी
|ठिकाण=रोहा जि. रायगड, महाराष्ट्र, भारत
|डोंगररांग=रोहा
|अवस्था=
|गाव=[[मेढे] निडी रेल्वे स्थानक]
}}
अवचितगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे किंवा कोलाडपासून उजवीकडे फुटलेला रस्ता रोहा या तालुक्याच्या गावाला जातो. कोकणातील कुंडलिका नदीच्या तीरावरील या रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये अवचितगड हा गर्द रानाने वेढलेला किल्ला आहे, महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून ५ कि.मी. वर असलेल्या या गडाची उंची तळापासून ३०५ मीटर किंवा १००० फूट आहे. घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.
अवचितगड
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.