सय्यद घराणे

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सय्यद घराणे

सय्यद घराणे (रोमन लिपी: Sayyid dynasty) इ.स. १४१४ ते इ.स. १४५१ या कालखंडात दिल्लीच्या सल्तनतीवर अधिकारारूढ असलेले राजघराणे होते. तुघलक घराण्याच्या सत्तेनंतर सय्यदांची दिल्ली सल्तनतीवर सत्ता सुरू झाली. सय्यद घराण्यानंतर लोधी घराण्याने दिल्लीवर राज्य केले.

सय्यदांचा मुहम्मद पैगंबराचे आपण वंशज असल्याचा दावा होता. इ.स. १३९८ साली तैमूरलंगाने केलेल्या दिल्लीवरील आक्रमणानंतर दिल्ली सल्तनतीवर कुणाचीच राजकीय पकड राहिली नाही. राजकीय अनागोंदीचा लाभ उठवत सय्यदांनी दिल्ली सल्तनतीची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. सय्यद घराण्याच्या ३७ वर्षांच्या शासनकाळात घराण्यातील चार व्यक्तींनी सल्तनतीवर राज्य केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →