समीर रंजन बर्मन हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून १९ फेब्रुवारी १९९२ ते १० मार्च १९९३ पर्यंत त्रिपुराचे मुख्यमंत्री होते. त्यांनी बिशालगढ विधानसभा मतदारसंघातून १९७२ मध्ये आणि नंतर १९८८ ते २००३ या काळात ५ निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. १९९३ ते १९९८ या काळात ते त्रिपुरा विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. ते त्रिपुरा प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्षही आहेत.
त्यांचा मुलगा सुदीप रॉय बर्मन हा देखील काँग्रेसचा राजकारणी आहे.
समीर रंजन बर्मन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!