समानतेच्या दिशेने समानतेच्या दिशेने हा अहवाल १९७४-७५ साली स्त्रीयांची भारतातील स्थीती तपासणाऱ्या समितीने दिलेला अहवाल आहे. ह्या अहवालामध्ये स्त्रीयांच्या तात्कालिन परिस्थीतील सामाजिक-सांस्कृतिक व्यवहार, राजकीय आणि आर्थिक प्रक्रिया यां मधील भेदभाव करणाऱ्या प्रक्रिया आणि व्यवहारांचा आढावा घेण्यात आला. हा अहवाल लोतिका सरकार आणि विणा मुजुमदार यांनी तयार केला, ह्या दोघींनी मिळूनच नंतर सेंटर फ़ॉर वुमन्स डेव्हलोपमेंट स्टडीज या स्वायत्त संस्थेची दिल्ही येथे स्थापना केली.
विकास आणि लोकशाही ह्या बाबत त्यावेळेला चर्चा करणाऱ्या लोकांचे डोळे ह्या लिंगभावाच्या दृष्टीकोनातून लिहिलेल्या अहवालाने चांगलेच उघडले. ह्या अहवालाने घटत्या लिंग-गुणोत्तराचा प्रश्न पहिल्यांदा भारतात चर्चेला आणला. त्यातूनच स्त्रीयांना केंद्रस्थानी ठेवून सरकारी योजनांची आखणी करण्याला आणि मुलींच्या शिक्षणावर भर देणाऱ्या योजना भारत सरकारने आणल्या..
समानतेच्या दिशेने
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.